तांत्रिक अडचणींमुळे 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण रद्द; इस्रो लवकरच नवीन वेळ जाहीर करणार

Foto
श्रीहरिकोटा: भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली घोषणा केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.

लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.

काय आहेत 'चांद्रयान-२' ची वैशिष्ट्ये

* चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

* चांद्रयान-२ चे वजन ३.८ टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

* चांद्रयान-२ चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही.

* यात १३ भारतीय पेलोड असतील त्यातील ८ ऑर्बिटर, ३ लँडर आणि २ रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker